माझी सरगमशी पहिली भेट :-
मला आजही तो दिवस आठवतो की, मी “A/c Assistant” पोस्टसाठी interview ला आलो होतो आणि माझा interview श्री. देवेश सर, विनोद सर आणि स्निग्धा मॅडम यांनी घेतलेला होता. मी A/c चे सर्व नियम आणि entries पाठ करून आलो होतो आणि मला त्याविषयी एकही प्रश्न विचारला नव्हता.माझ्या मनात एकच प्रश्न येत होता की, मी A/c Assistant च्या पोस्ट साठी आलो आहे आणि हे सर्वजण मला माझ्या आवडीनिवडी, मित्रपरिवार आणि वैयक्तिक माहिती का विचारत आहेत? आणि आता मला काय काम करायला सांगतात तेवढ्यात एक शेवटचा प्रश्न विचारला की, अमोल तू स्वतःला पाच वर्षात कुठे बघतोस?
तेव्हा मी ताबडतोब उत्तर दिले की, जिथे विनोद सर आहेत ना तिथे ! तेव्हा मला सरांनी वेलकम म्हटले होते. नंतर मी सरगमला जॉईन झालो आणि हळूहळू विनोद सरांसोबत काम करू लागलो.
विनोद सरांसोबत काम करतानाचा अनुभव खूपच वेगळा होता म्हणजे त्यांना कुठलेही काम कमीत कमी वेळेत, नीटनेटके आणि हिशोबाला अगदी चोख आणि परिपूर्ण लागत होते. मी खूपच नवीन असल्याने मला ते जमत नसायचे पण मला ते विनोद सरांनी शिकवले. आणि मला त्याचा खूप फायदा झाला. मी आज सरगमला जे काही शिकलो ते फक्त आणि फक्त विनोद सरांमुळेच. तसेच माझे इतर सहकारी मित्र नाझीर सर, श्याम सर, नवनाथ सर, निलेश आणि नाठे सर, प्रवीणा मॅडम यांच्याकडून देखील मी वेळोवेळी नवीन नवीन शिकतच गेलो. आज सरगम मध्ये “A/c Assistant” ते “Finance & Costing Head” पर्यंतचा जो प्रवास आहे तो सर्व तुमच्या सहकार्याने झाला याचा आनंद वाटतो.
याच्यात सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे देवेश सर, स्निग्धा मॅडम आणि विनोद सर यांनी माझ्यावर दाखवलेला “विश्वास” !
माझं सरगमशी नातं :-
सरगम ही एक नुसती कंपनी नसून ती एक फॅमिली आहे आणि ह्या फॅमिली मध्ये बरेच लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आम्ही एकत्रित एका कुटुंबासारखे राहतो. सरगम मध्ये आम्ही सर्वजण खूप जिव्हाळ्याने आणि एकत्रित राहतो. सरगममध्ये आल्यावर आम्हाला आमच्याच घरात आल्यासारखे वाटते. सरगममध्ये मला काम करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य मिळते याचा मला आनंद वाटतो. सरगम मध्ये खूप “Growth Opportunity” येतात तेव्हा Management सर्वांचा विचार करते याचे मला “Proud” वाटते. तसेच देवेश सरांकडून मला “Strategic Management” विषयी नेहमी वेळोवेळी खूप छान माहिती मिळते आणि याचा मला खूप फायदा होतो आणि मला ते आवडते.
– अमोल पिंगळे
Finance & Costing Head