Sargam Industries.

Finding My Shine

साधारण जुन २००९ मध्ये सरगम ला interview साठी आलो होतो. देवेश सर व नासिर दोघांनी माझा interview घेतला होता. Trial म्हणुन ३ दिवस काम बघून नंतर सरांनी OK म्हणुन सांगितलं. या दरम्यान गंमत अशी की मला पगाराची अपेक्षा विचारल्यानंतर माझ्या आधीच्या पगारापेक्षा जास्त अशा ९५००/- रुपयांची मी मागणी केली. सरांनी स्वत:हुन मला ११५००/- पगार offer केला. ही गोष्ट मला फार appeal झाली. त्यानंतर ३ महिन्यांनी join करीन असं सांगितलेलं ही सरांनी मान्य केलं होतं.

ज्या work culture मधुन मी आलो होतो त्याच्या complete opposite वातावरण सरगममध्ये होतं. इथे तुमचे boss तुमच्या सोबत जोक वगैरे करतात, तुमची आपुलकीने वैयक्तिक चौकशी करतात, तुम्ही वेळेत घरी जावं असं सांगतात, personal किंवा professional growth व्हावी म्हणून काही courses / classes कर म्हणून सांगतात. एकूणच work life balance maintain झाला पाहीजे असं ensure करतात. याचं महत्त्व मला तेंव्हा लक्षात येत नव्हतं पण आता येतं.

वैयक्तिक माझ्यावर देवेश सरांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक खूप संस्कार झालेत असं मी मानतो. कुठल्याही कामात Humanity & relationship या दोन गोष्टी मी त्यांच्यात खूप notice करतो.
Team विषयी बोलायचं तर (सध्या असणारे व कार्यरत नसणार्‍यांपैकी विशेष करुन नाठे सर आणि प्रविणा मॅडम) प्रत्येक जण एक स्वतंत्र “property own” करतो. या सर्व properties चं एकजीव solution म्हणजे सरगम.
यथा राजा तथा प्रजा म्हणतात तसं आपल्याकडे employees सुद्धा relationship ला महत्त्व देणारे नसतील तर मग फार काळ टिकूही शकत नाहीत हे मी notice केलंय.

शाम व नासिरच्या वेळी मी हजर नव्हतो पण स्वानुभावाने सांगतो सरांनी माझ्यासारखंच त्यांनाही आपल्या कामाच्याच process सारखं –
१) सर्वप्रथम आम्हाला Inward झाल्यावर Inspection करुन OK आढळल्यावरच accept केलं.
२) त्यानंतर आम्हाला वेळोवेळी activate केलं.
3) Bond व्यवस्थित झाल्यावर हळूहळू आम्हाला strike 🏏 वर आणलं.
४) Silver प्रमाणे shine करु शकतील व Heating moments ला stand होऊ शकतील असं लक्षात आल्यावर तिघांना तीन ठिकाणी dispatch केलं.

– Vinod Patil
Plant Head (Chakan)

Leave a Comment