29 मार्च 1984. माझा एक मित्र R K Ind. मध्ये कामाला होता.
(आता तिथे RTF आहे.) तो मला समोरच्या कंपनीत काम मिळेल असे सांगून घेऊन गेला. सगळीकडे पाणीच पाणी सांडलेले होते. लाकडी जिना चढून माळ्यावर गेलो. तिथे पोटापर्यंत दाढी वाढवलेले व मोडलेला हात गळ्यात बांधून एक तिशीतील गृहस्थ बसलेले होते.
देशपांडे यांनी माझी ओळख सांगून याला कामाला घ्या अशी विनंती केली. मला न्याहाळत काहीही न विचारता उद्यापासून कामाला या असे सांगितले. बाहेर आल्यावर मी मित्राला त्या गृहस्थांबद्दल विचारले.
उत्तर… त्यांचे नाव लोकेश शेवडे. सरगम कंपनीचे मालक. अशी ही पहिली भेट.
– S.T Nathe