“जून २०२४ मध्ये सरगमला ४५ वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्ताने काही आठवणी गोळा करायच्या आहेत. तुझ्या लिखाणाची वाट पाहत आहे” असा आदेश वजा मेसेज स्निग्धचा आला म्हणून हे लिखाण. हे लिखाण “मी कोण” म्हणून करावे याचा माझ्या मनात थोडा गोंधळ झाला व त्यामुळे अजूनच उशीर झाला आहे.
As an auditor, we are expected to express our opinion about the “True and fair view” of the state of affairs of the business.
म्हणजे अजूनच लोचा. कारण true आणि fair याची संकल्पना सापेक्ष असते. त्यामुळे मी हे लिखाण “substance over form” या उक्तीच्या युक्तीने वापर करून केवळ एक सन्मित्र म्हणून करत आहे सीए म्हणून नाही.
२००८ साली मला अचानक लोकेशचा फोन आला की तुला भेटायचं आहे. त्याला माझ्या मेंदूत झालेल्या गडबडीची व त्यामुळे नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेची कल्पना असल्यामुळे तो माझी चौकशी करायला येतो आहे असा माझा समज झाला. पण “तो आला व त्याने जिंकले” या थाटात मला विचारले की आम्ही एका सीएच्या शोधात आहोत तर तू आमचा सीए म्हणून काम करशील का?
शोधात आहोत तर तू आमचा सीए म्हणून काम करशील का? माझा माझ्यावरच विश्वास बसेना कारण तोवर मी माझ्या लहानपणापासून लोकेशला “दादा” या भूमिकेतून लांबूनच बघत होतो व विविध क्षेत्रातील त्याची मुशाफिरी पाहत होतो. त्याने त्याच्या पूर्वीच्या सीएची केलेली जाहीर निंदा वाचून होतो.
एकाच व्यवसायात दोन भिन्न स्वभावाची मात्र एका विचाराची माणसे असूनही तो व्यवसाय फुलवता येतोय याचे “सरगम” हे विरळा उदाहरण आहे. एक म्हणजे उसळत्या (उकळत्या पाण्यात ओतले जाणारे) थंड निर्मळ पाणी! अशा या मिश्रणामुळे व्यवसायाचा मळा आपोआपच फुलणार!
४५ वर्षे, कालच व्यवसाय चालू झाला आहे ह्या भावनेने व त्याच श्रद्धेने करणं, सोपं नाही. आपण व्यवसाय करतो म्हणजे काय व का करतो यांची जाण व भान असणे हे यशस्वी उद्योगांचे लक्षण आहे असे मी मानतो. कारण अवती-भवती व्यवसायाच्या नावाने चाललेल्या उलाढाली सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की व्यवसायाची जाण व भान असणे हे किती महत्त्वाचे आहे हे जाणकारांना लगेच कळते.
मला वाटतं “सरगम” हा शब्द फक्त षड्ज ते निषाद या सात स्वरांचा समूह नाहीये तर सश्रध्दता व सक्षमता यांचा संगम आहे. हे दोन्ही गुण मालकांच्या व्यावसायिक वागणुकीत सतत डोकावत असतात. गंमत म्हणजे प्रथम बाबुजी व नंतर लोकेश या दोघांनी या व्यवसायातील महत्त्वाच्या असलेल्या कच्च्या मालाला म्हणजे चांदीला आपल्या डोक्यावर (केसाच्या रूपाने) बाळगले आहे.
नुसता व्यवसाय करत राहणे हे व्यवसायांचे ध्येय नसावे तर संपूर्ण मूल्यव्यवस्था आस्थेने निर्माण करणे हे असावे. “सरगम” म्हणजे या मूल्यव्यवस्थेत नेमके काय हवे याचा नमुना आहे. “सरगम” या व्यवसायात फक्त आपल्या ग्राहकाच्या समाधानाचा विचार नसतो तर व्यवसायात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या समाधानाचाही विचार असतो असं माझ्या लक्षात आले.
मालकांचा उत्तराधिकारी हा कुटुंबातूनच आला पाहिजे हा हट्ट कौटुंबिक व्यवसायात धरण्याचा मोह भल्याभल्यांना होतो मात्र तो आपल्या कर्मचाऱ्यांमधूनही निवडता येतो हा विचार छोट्या व्यवसायात अंमलात आणणारा “सरगम” हा अत्यंत दुर्मिळ उद्योग समूह आहे.
उद्योग कसा करावा हे शिकणारी व शिकवणारी एक चळवळ (जी वळवळ ठरली आहे असं माझं केवळ माझ्या त्या चळवळीत हिरीरीने सहभागी झालेल्या काही व्यवसायिकांकडे पाहून झालेले आहे) नाशकात आहे.
त्या चळवळीत सक्रिय असलेले शेवडे कुटुंब पाहताना मला त्यांची जी गोष्ट भावते ती म्हणजे त्यांची व्यवसायाबद्दलची भक्ती तसेच छोटा, मध्यम व मोठ्या अशी कोणत्याही प्रकारची वर्गवारी व त्यामुळे निर्माण होणारा कोणताही “गंड” याची फिकीर न करता संपूर्ण सामर्थ्यानिशी रोजच्या व्यवहाराकडे नाविन्याने बघण्याची वृत्ती व त्यामुळे तयार होणारी दृष्टी!
त्यात आप्तांपैकी मी ही एक म्हणून माझ्या वैयक्तिक आयुष्यात “हेवा करावं” असं खास स्थान मिळवणाऱ्या या मैत्रीला यानिमित्ताने आभाराचा, सहज सप्रेम नमस्कार…!
– मकरंद महादेवकर
Translation –
Sargam Industries will complete 45 years in June 2024. I want to collect some memories on the occasion. When I received “Waiting for your writing” from Snigdha, I got a little confused about writing this as “who am I” and that’s why the delayed writeup.
As an auditor, we are expected to express our opinion about the “True and fair view” of the state of affairs of the business.
That means even more confusion. Because the concept of true and fair is relative. So I am doing this writing only as a friend and not as a CA using the trick of the saying “substance over form”.
In 2008 I suddenly got a call from Lokesh saying he wants to meet me. I assumed that he was coming to inquire about me because he had an idea about my brain disorder and the recent surgery. But in a “he came and he won” style asked me, would you be our CA?
I couldn’t believe myself because since my childhood I have been watching Lokesh from afar in the role of “Dada” and watching his achievements in various fields. I was aware about the last issues with his old CA.
“Sargam” is a rare example of how two people of different nature but one mind can thrive in the same business. One is bubbling (poured into boiling water) cold clear water! Due to this combination, the business will flourish automatically!
For 45 years, doing it with the same faith and feeling that the business started yesterday is not easy. I believe that the hallmark of successful businesses is knowing what and why you are doing business. Because the transactions carried on in the name of forward-looking business are now so large that the savvy know immediately how important it is to have business knowledge and awareness.
I think the word “Sargam” is not just a group of seven vowels but a confluence of strength and competence. Both these qualities are constantly seeping into the business behavior of the owners. Ironically, first Babuji and then Lokesh both carried the important raw material of this business i.e. silver on their heads (in the form of hair).
The goal of businesses should not be to simply continue doing business but to create an entire value system with passion. “Sargam” is a model of exactly what is wanted in this value system. I realised that “Sargam” does not only think about the satisfaction of its customers but also about the satisfaction of every employee working in the business.
While it is tempting for the well-to-do in family businesses to insist that the successor of the owners must come from within the family, “Sargam” is a very rare group of companies that implements the idea in small businesses that they can also choose from among their employees.
To learn and teach to do a business is a movement (which I know has turned out to be crooked just by looking at some of the business people who actively participated in that movement) is in ruins.
When I see the Shevde family active in that movement, what strikes me is their devotion to business and their innovative attitude towards day-to-day business with full force, it creates. Vision!
I feel I am one of them, and on this occasion, thank you for this friendship, which has earned a special place in my personal life.
– Makarand Mahadevkar